द नेमसेक

काल, काही तासात झुंपा लाहिरी चे “नेमसेक” वाचून काढले. खूप कमी अशी पुस्तके आहेत, जे एकदा का हातात घेतले की वेळेचं आणि भुकेचं भान राहत नाही. “नेमसेक”, त्या गटातलं एक पुस्तक. ह्या पुस्तकावर आधारीत त्याच नावाचा एक चित्रपट ही आहे, तो मी अजून बघितला नाही (आणि आता विशेष इच्छा पण नाही राहिली). पुस्तक वाचताना जे चित्र मनात उभे झाले, ते कदाचित पुसलं जाईल.

नावात ओळखी चा शोध – असा ह्या पुस्तकाचा ग्रंथ-परिचय.

जेव्हा अस्मिता चा प्रश्न येतो, तेव्हा, नेहमी अश्या गोष्टींचे मुख्य पात्र भारतीय अप्रवासी का असतात? भारतात राहणाऱ्यांना असा प्रश्न कधी येत नाही का?

Advertisements

कुणी ऐकलं नाही तर

Light Pencil - 2

शेवटच्या अंका नंतर टाळ्या वाजल्या नाही तर
ते भरलेले लाल डोळे पुसत
मनोगतीने मनोगत म्हणावं म्हणून
रंगमंचावर परत येशील का?

शब्द तू जोडलेले कुणी वाचले नाही तर
शब्दांचा तिरस्कार न करत
विचार फक्त व्यक्त करायचे म्हणून
स्वतःसाठी परत लिहिशील का?

दारा बाहेर असल्याचा भास झाला तर
थरथरणारे हात घट करत
मनातली भिती घालवून
माझ्यासाठी दार उघडशील का?

उत्तर

काही गोष्टी लिहिता येत नाहीत. काही भावना व्यक्त करता येत नाहीत. आतल्या आत एकमेकाशी भांडत बसतात. पन्नास वेळा काही लिहायला सुरुवात होती, पन्नास वेळा कागद फाडला जातो; चुरगाळला जातो. शब्दांना दोष दिला जातो, शब्द अपुरे पडतात म्हणे. हे लिहिताना थोडं हसू येतं, शब्द अपुरे तेव्हा पडतात जेव्हा स्वतःलाच भावना ओळखू येत नाही.

तुला काय वाटतं?

ह्या प्रश्नाला सोपे असे उत्तर असते, तर किती बरं झालं असतं – दोन-चार मोजक्या भावना असत्या तर किती बरं झालं असतं! मला जे वाटते ते शब्दांच्या पालीकडले नसून माझ्या समजण्या ही पालीकडले असेल तर तुला काय उत्तर देऊ?

म म मराठी

मराठी ब्लॉग विश्व, त्यांच्या प्रमाणे, समस्त मराठी ब्लॉगांना एका शृंखलेत गुंफणे हे त्यांचे मूळ प्रयोजन आहे. कधी बघा, जर गेला नसाल तर. उत्तम प्रयोजन आहे. 

एक गोष्ट लक्ष्यात आली का तुमच्या? डावी कडे, सर्व मराठी ब्लॉगची लिस्ट आहे. जास्त करून, ब्लॉग मी”, “माझी”, “माझे”, “मराठी”, आणी मनह्या शब्दांवर आधारीत आहे. माझा ब्लॉग सुद्धा माय सह्याद्री आहे. 

मराठी माणसाचं ह्या अक्षरावर इतकं प्रेम, इतकी ओढ? का बरं? 

ब्लॉक

रायटर्स ब्लॉक जसा असतो, तसा म्हणे ब्लॉगर्स ब्लोक सुद्धा आहे. बाकी सर्व ब्लॉग व्यवस्थित लिहीत आहे पण माय सह्याद्री वर आणी ठेले पे हिमालय (हिंदी ब्लॉग) वर मात्र ब्लॉगर्स ब्लॉक लागलाय. मग हा ब्लॉगर्स ब्लॉक नसून देवनागरी ब्लॉगिंग ब्लॉक असावा. 

विचार अपुरे पडत नाहीत, शब्द अपुरे पडतात. ते शब्दांची वाट पाहत असतात. मी ही वाट पाहत आहे. येतील, खात्री आहे.   

एक अर्धवट टॅग


मिंट्स ने पूर्वी मला टॅग लावलाहोता. त्या टॅगच्या पाचव्या प्रश्नाचं उत्तर मी दिले नव्हते. प्रश्न होता, एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे. 

विश्वास पाटील लिखित संभाजी. 

सध्या तरी सर्वात प्रिय पुस्तक. अजून वाचायला घेतले नाही कारण एक पान वाचायला मला साधारण अर्धा तास लागतो. हे आठशे चाळीस पानांचं पुस्तक वाचायला साधारण १८ दिवस लागतील – रोज चोवीस तास वाचले तर. 

द ऍलकेमिस्ट ह्या पुस्तकाचे भाषांतर बऱ्याच भाषेत झालेले आहे. म्हणून का हे पुस्तक प्रसिद्ध आहे? का ह्या प्रसिद्धींचं श्रेय त्या पुस्तकच्या प्रकाशकाला आणी लेखकाला द्यायचे? उत्तम विक्रीनिती? 

कदाचित दोन्ही. 

मराठी साहित्य, मराठी भाषेवर अवलंबून नसावे. त्या प्रमाणे, कोणतेही साहित्य कोणत्याही भाषेवर अवलंबून नसावे. 

मराठी माणूस जागा आहे, आहे नं?

मराठी माणूस जागा हो

 

मी काहीतरी मराठी नाट्याबद्दल बोललो; आमचा संवाद काइंड ऑफ असा होता:

 

तो म्हणाला, “सही रे सही, काहीतरी नार्वेकर नाव आहे – मुलाखत बघत होतो. बाकी सगळे नाटक फ्लॉप झाल्या नंतर – हे गाजलेलं नाटक आहे तिचे.

 

आई म्हणाली – खुप छान आहे नाटक”, मी म्हणालो.

 

आठवलं – तिचं नाव लता नार्वेकर – मराठी नाटकात पैसा नाही म्हणे. मला आश्चर्य वाटलं, तुला?”

 

नाही, काही विशेष नाही. काहीतरी कलात्मक करणे आणी पैसा कमावणे – ह्या गुंत्या मध्ये कुठेतरी मराठी नाट्य आणी चित्रपट अडकलेला आहे. ह्या गुंत्यात ही कला जगते कशी – हेच मला नवल वाटते. काही चांगले चित्रपट खूप दुर्बोध असतात – बाकी सर्व शब्दांचे खेळ. कचरा!

 

मराठी माणूस – जागा हो!

 

आहे रे – मी जागाच आहे – बाकीचे का झोपले आहेत? आपलं जग बदलत आहे – मराठी माणूस पुणे, मुंबई, कोल्हापूर च्या बाहेर पडलाय – त्याचं जग बदलतंय – बदललंय – इन फैक्ट. द स्टेज हॅज़् टेकन द ऑडियंस फॉर ग्रांटेड! अजूनही तेच वागणे, तसाच व्यवहार आणी तोच आकार.

 

हा संवाद चालू राहिला – पण – मराठी माणसाचं जागं राहण्याचं रहस्य कळलं नही – अजून ही.