द ओव्हरकोट

ह्या पुस्तकाचा प्रभाव बघा, द नेमसेक मध्ये निकोलाइ गॉगल च्या द ओव्हरकोट, ह्या गोष्टी चा बर्‍याचदा उल्लेख आहे. वास्तविक पाहता द नेमसेक काही रित्या द ओव्हरकोट भोवती आखलेली आहे.

एवढे काय आहे ह्या (द ओव्हरकोट) गोष्टी मध्ये? आणि कोण हा निकोलाइ गॉगल? मला राहवेना आणि आज हि गोष्ट वाचून काढली.

काही गोष्टींचा चित्रपट बनवायची गरज नसते. जे काही चित्र लेखकाच्या डोळ्या समोर असतं, त्या साठी त्याचे शब्दच पुरे असतात – पण सर्व लेखक असे लिहू शकत नाहीत. चेहर्‍यावरचे भाव – त्यांचं विवरण करणं खूप काही अवघड नाही – पण मनातले भाव दोन-चार शब्दात सांगणं – ही एक वेगळी कला आहे.

निकोलाइ गॉगल, आता, माझा आणि एक आवडता लेखक.

Advertisements

द नेमसेक

काल, काही तासात झुंपा लाहिरी चे “नेमसेक” वाचून काढले. खूप कमी अशी पुस्तके आहेत, जे एकदा का हातात घेतले की वेळेचं आणि भुकेचं भान राहत नाही. “नेमसेक”, त्या गटातलं एक पुस्तक. ह्या पुस्तकावर आधारीत त्याच नावाचा एक चित्रपट ही आहे, तो मी अजून बघितला नाही (आणि आता विशेष इच्छा पण नाही राहिली). पुस्तक वाचताना जे चित्र मनात उभे झाले, ते कदाचित पुसलं जाईल.

नावात ओळखी चा शोध – असा ह्या पुस्तकाचा ग्रंथ-परिचय.

जेव्हा अस्मिता चा प्रश्न येतो, तेव्हा, नेहमी अश्या गोष्टींचे मुख्य पात्र भारतीय अप्रवासी का असतात? भारतात राहणाऱ्यांना असा प्रश्न कधी येत नाही का?

एक अर्धवट टॅग


मिंट्स ने पूर्वी मला टॅग लावलाहोता. त्या टॅगच्या पाचव्या प्रश्नाचं उत्तर मी दिले नव्हते. प्रश्न होता, एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे. 

विश्वास पाटील लिखित संभाजी. 

सध्या तरी सर्वात प्रिय पुस्तक. अजून वाचायला घेतले नाही कारण एक पान वाचायला मला साधारण अर्धा तास लागतो. हे आठशे चाळीस पानांचं पुस्तक वाचायला साधारण १८ दिवस लागतील – रोज चोवीस तास वाचले तर. 

द ऍलकेमिस्ट ह्या पुस्तकाचे भाषांतर बऱ्याच भाषेत झालेले आहे. म्हणून का हे पुस्तक प्रसिद्ध आहे? का ह्या प्रसिद्धींचं श्रेय त्या पुस्तकच्या प्रकाशकाला आणी लेखकाला द्यायचे? उत्तम विक्रीनिती? 

कदाचित दोन्ही. 

मराठी साहित्य, मराठी भाषेवर अवलंबून नसावे. त्या प्रमाणे, कोणतेही साहित्य कोणत्याही भाषेवर अवलंबून नसावे.