काही गोष्ठी

काही गोष्ठी सगळ्यांना सांगता येत नाहीत. शब्द कमी पडतात म्हणुन नाही, त्यांना कितपत कळेल म्हणुन. तुम्च्या कडे शब्दांचा भंडार असेल, पण त्यांची समजण्याची क्षमता?

ती कशी मोजाल?

Advertisements

चारोळ्या

बरेच दिवस झाले, येथे काही लिहीले नाही. कारण साधं-सोपं अाहे, पण थोडं विचित्र. मॅक घेतल्या पासुन मराठीत लिहीणं अवघड झाले अाहे. एका ब्रौझर मध्ये अक्षरं व्यवस्थीत दिसत नाहीत, तर दुसऱ्यात व्यवस्थीत लिहीता येत नाहीत. वर आणि स्पेलचेक नाही. बोंबला!

ह्या चार ओळी लिहायला अर्धा तास लागला.

तू अशी जवळी रहा

With you...

काही दिवसा पासून हे चित्र, न बघता, सतत दिसत आहे. एकटेपणा नेहमीच वाईट नसतो – कधीतरी स्वतःच्या विचारांना सुद्धा बोलू द्यावं. कधीतरी त्यांचं सुद्धा ऐकावं. पण कधी-कधी – त्यांचा कलकलाट सहन होत नाही.

ट्रेंट कंट्री पार्क, लंडन. २७ एप्रिल, २००६

द ओव्हरकोट

ह्या पुस्तकाचा प्रभाव बघा, द नेमसेक मध्ये निकोलाइ गॉगल च्या द ओव्हरकोट, ह्या गोष्टी चा बर्‍याचदा उल्लेख आहे. वास्तविक पाहता द नेमसेक काही रित्या द ओव्हरकोट भोवती आखलेली आहे.

एवढे काय आहे ह्या (द ओव्हरकोट) गोष्टी मध्ये? आणि कोण हा निकोलाइ गॉगल? मला राहवेना आणि आज हि गोष्ट वाचून काढली.

काही गोष्टींचा चित्रपट बनवायची गरज नसते. जे काही चित्र लेखकाच्या डोळ्या समोर असतं, त्या साठी त्याचे शब्दच पुरे असतात – पण सर्व लेखक असे लिहू शकत नाहीत. चेहर्‍यावरचे भाव – त्यांचं विवरण करणं खूप काही अवघड नाही – पण मनातले भाव दोन-चार शब्दात सांगणं – ही एक वेगळी कला आहे.

निकोलाइ गॉगल, आता, माझा आणि एक आवडता लेखक.

कुणी ऐकलं नाही तर

Light Pencil - 2

शेवटच्या अंका नंतर टाळ्या वाजल्या नाही तर
ते भरलेले लाल डोळे पुसत
मनोगतीने मनोगत म्हणावं म्हणून
रंगमंचावर परत येशील का?

शब्द तू जोडलेले कुणी वाचले नाही तर
शब्दांचा तिरस्कार न करत
विचार फक्त व्यक्त करायचे म्हणून
स्वतःसाठी परत लिहिशील का?

दारा बाहेर असल्याचा भास झाला तर
थरथरणारे हात घट करत
मनातली भिती घालवून
माझ्यासाठी दार उघडशील का?

उत्तर

काही गोष्टी लिहिता येत नाहीत. काही भावना व्यक्त करता येत नाहीत. आतल्या आत एकमेकाशी भांडत बसतात. पन्नास वेळा काही लिहायला सुरुवात होती, पन्नास वेळा कागद फाडला जातो; चुरगाळला जातो. शब्दांना दोष दिला जातो, शब्द अपुरे पडतात म्हणे. हे लिहिताना थोडं हसू येतं, शब्द अपुरे तेव्हा पडतात जेव्हा स्वतःलाच भावना ओळखू येत नाही.

तुला काय वाटतं?

ह्या प्रश्नाला सोपे असे उत्तर असते, तर किती बरं झालं असतं – दोन-चार मोजक्या भावना असत्या तर किती बरं झालं असतं! मला जे वाटते ते शब्दांच्या पालीकडले नसून माझ्या समजण्या ही पालीकडले असेल तर तुला काय उत्तर देऊ?

म म मराठी

मराठी ब्लॉग विश्व, त्यांच्या प्रमाणे, समस्त मराठी ब्लॉगांना एका शृंखलेत गुंफणे हे त्यांचे मूळ प्रयोजन आहे. कधी बघा, जर गेला नसाल तर. उत्तम प्रयोजन आहे. 

एक गोष्ट लक्ष्यात आली का तुमच्या? डावी कडे, सर्व मराठी ब्लॉगची लिस्ट आहे. जास्त करून, ब्लॉग मी”, “माझी”, “माझे”, “मराठी”, आणी मनह्या शब्दांवर आधारीत आहे. माझा ब्लॉग सुद्धा माय सह्याद्री आहे. 

मराठी माणसाचं ह्या अक्षरावर इतकं प्रेम, इतकी ओढ? का बरं? 

ब्लॉक

रायटर्स ब्लॉक जसा असतो, तसा म्हणे ब्लॉगर्स ब्लोक सुद्धा आहे. बाकी सर्व ब्लॉग व्यवस्थित लिहीत आहे पण माय सह्याद्री वर आणी ठेले पे हिमालय (हिंदी ब्लॉग) वर मात्र ब्लॉगर्स ब्लॉक लागलाय. मग हा ब्लॉगर्स ब्लॉक नसून देवनागरी ब्लॉगिंग ब्लॉक असावा. 

विचार अपुरे पडत नाहीत, शब्द अपुरे पडतात. ते शब्दांची वाट पाहत असतात. मी ही वाट पाहत आहे. येतील, खात्री आहे.