आठवणी सुंदर असतात

आम्ही दोघे एकमेकाला फोन करत नाही. पत्र देखील पाठवत नाही, काही वर्षापूर्वी एक इमेल पाठवलं होतं. मला त्याची आठवण येते – त्याला हि माझी आठवण येते. असं नाही कि आम्ही एकमेकाला विसरून गेलो आहे. खरं तर खूप आठवण येते. पण फोन करून काय होणार? काय म्हणणार? मला तुझी आठवण आली म्हणून फोन केला? मग काय? आठवणीचं कारण सांगितल्या नंतर पुढे काय बोलणार? तू कसा – मी कसा – आई-वडील कसे? बाकी?

 

फोन करणे म्हणजे आठवणी ला जीव देणे. जेव्हा एका आठवणी साठी आपण फोन करतो – तेव्हा ती आठवण नाहीशी होऊन जाते. राहते – ती फक्त त्या फोनवर केलेल्या चर्चेची राख.

आठवणींना सीमा नसते. त्यांना खूप मोठा वाव असतो. आठवणीत काहीही होऊ शकतं – फोन वरच्या बोलण्याला सीमा असते.

आठवणी सुंदर असतात.

PS: in the sentence, “फोन करणे म्हणजे आठवणी ला जीव देणे” I really mean to say that calling up, makes the thought material, physical. It becomes discrete. Pardon my impoverished vocabulary. I’d welcome any suggestions.

Advertisements

पे रु चा पा पै

असं वाटतं पूर्वी कधी ऐकलेली एक गोष्ट, समोर एका कागदावर असावी, आणी पटकन ती उचलून वाचता यावी. जेव्हा कोण काही सांगत असतं, तेव्हा आपण कधी लक्ष देत नाही. मनाच्या मागच्या काळ्या खोलीत बंद करून ठेवून टाकतो. वीस-एक वर्षा नंतर, असच एका कुठल्या बुधवार-दुपारच्या चार वाजता, अचानक आठवण येते – आपण जे ऐकलं होतं ते महत्त्वाचं काहीतरी होतं, पण ती नेमकी गोष्ट आठवत नाही.

माझा असा एक कोपरा

Red Chair on Steps

माझा असा एक कोपरा
तुझ्या पासून लांब.
जिथे तुझं वर्चस्व नाही
माझा खोटा कमीपणा नाही.

माझा असा एक कोपरा
तुझ्या पासून लांब.
मी मी असू शकतो
तुला पुरावा द्यावा लागत नाही.

माझा असा एक कोपरा
तुझ्या पासून लांब.
माझा असा एक कोपरा
मी आज शोधत आहे.

काही गोष्ठी

काही गोष्ठी सगळ्यांना सांगता येत नाहीत. शब्द कमी पडतात म्हणुन नाही, त्यांना कितपत कळेल म्हणुन. तुम्च्या कडे शब्दांचा भंडार असेल, पण त्यांची समजण्याची क्षमता?

ती कशी मोजाल?

तू अशी जवळी रहा

With you...

काही दिवसा पासून हे चित्र, न बघता, सतत दिसत आहे. एकटेपणा नेहमीच वाईट नसतो – कधीतरी स्वतःच्या विचारांना सुद्धा बोलू द्यावं. कधीतरी त्यांचं सुद्धा ऐकावं. पण कधी-कधी – त्यांचा कलकलाट सहन होत नाही.

ट्रेंट कंट्री पार्क, लंडन. २७ एप्रिल, २००६

द नेमसेक

काल, काही तासात झुंपा लाहिरी चे “नेमसेक” वाचून काढले. खूप कमी अशी पुस्तके आहेत, जे एकदा का हातात घेतले की वेळेचं आणि भुकेचं भान राहत नाही. “नेमसेक”, त्या गटातलं एक पुस्तक. ह्या पुस्तकावर आधारीत त्याच नावाचा एक चित्रपट ही आहे, तो मी अजून बघितला नाही (आणि आता विशेष इच्छा पण नाही राहिली). पुस्तक वाचताना जे चित्र मनात उभे झाले, ते कदाचित पुसलं जाईल.

नावात ओळखी चा शोध – असा ह्या पुस्तकाचा ग्रंथ-परिचय.

जेव्हा अस्मिता चा प्रश्न येतो, तेव्हा, नेहमी अश्या गोष्टींचे मुख्य पात्र भारतीय अप्रवासी का असतात? भारतात राहणाऱ्यांना असा प्रश्न कधी येत नाही का?

कुणी ऐकलं नाही तर

Light Pencil - 2

शेवटच्या अंका नंतर टाळ्या वाजल्या नाही तर
ते भरलेले लाल डोळे पुसत
मनोगतीने मनोगत म्हणावं म्हणून
रंगमंचावर परत येशील का?

शब्द तू जोडलेले कुणी वाचले नाही तर
शब्दांचा तिरस्कार न करत
विचार फक्त व्यक्त करायचे म्हणून
स्वतःसाठी परत लिहिशील का?

दारा बाहेर असल्याचा भास झाला तर
थरथरणारे हात घट करत
मनातली भिती घालवून
माझ्यासाठी दार उघडशील का?

उत्तर

काही गोष्टी लिहिता येत नाहीत. काही भावना व्यक्त करता येत नाहीत. आतल्या आत एकमेकाशी भांडत बसतात. पन्नास वेळा काही लिहायला सुरुवात होती, पन्नास वेळा कागद फाडला जातो; चुरगाळला जातो. शब्दांना दोष दिला जातो, शब्द अपुरे पडतात म्हणे. हे लिहिताना थोडं हसू येतं, शब्द अपुरे तेव्हा पडतात जेव्हा स्वतःलाच भावना ओळखू येत नाही.

तुला काय वाटतं?

ह्या प्रश्नाला सोपे असे उत्तर असते, तर किती बरं झालं असतं – दोन-चार मोजक्या भावना असत्या तर किती बरं झालं असतं! मला जे वाटते ते शब्दांच्या पालीकडले नसून माझ्या समजण्या ही पालीकडले असेल तर तुला काय उत्तर देऊ?