टॅगलो गेलो – द्वितीय

साडे-तीन वर्षा पूर्वी मराठीत पहिल्यांदा टॅगलो गेलो होता. त्या नंतर एक अर्धवट टॅग. आता हा. मीनल चा टॅग. खरं म्हणजे तिने टॅग केलं नाही – मीच मागून घेतला. बडबड नंतर करतो, आधी टॅग.

1.Where is your cell phone?
चार्जायला लावला आहे.
2.Your hair?
आहेत.
3.Your mother?
झोपली आहे; म्हणून तर आता लिहित बसलो आहे.
4.Your father?
बेस्ट फ्रेंड.
5.Your favourite food?
सध्या तरी शवर्मा.
6.Your dream last night?
आठवत नाही; बरं आहे, विचित्र असतात.
7.Your favorite drink?
दुध.
8.Your dream/goal?
शाबूत.
9.What room are you in?
तिसरी.
10.Your hobby?
चित्र काढणे.
11.Your fear?
लोकं मलाच घाबरतात.
12.Where do you want to be in 6 years?
अद्मोते सहा का? पाच किंव्हा दहा का नाही?
13.Where were you last night?
घरी.
14.Something that you aren’t diplomatic?
तसं बघायला गेला तर सगळच.
15.Muffins?
लंडन मेढे चांगले मिळतात.
16.Wish list item?
कितवा?
17.Where did you grow up?
भारत भर.
18.Last thing you did?
सतराव्या प्रश्नाचं उत्तर.
19.What are you wearing?
कपडे.
20.Your TV?
बंद आहे.
21.Your pets?
मुंबईत? फ्लॅट सिस्टम मध्ये?
22.Friends
जीव.
23.Your life?
मस्त!
24.Your mood?
झकास.
25.Missing someone?
हो.
26.Vehicle?
पार्किंग मध्ये.
27.Something you’re not wearing?
मंगळसूत्र.
28.Your favorite store?
इलेक्ट्रोनिक वाले सगळे.
29.When was the last time you laughed?
पाच मिनिटापूर्वी.
30.Last time you cried?
आठवत नाही.
31.Your best friend?
नेहमी माझ्याबोरोबर.
32.One place that you go to over and over?
ऑफिस – आणी कुठे?
33.One person who emails me regularly?
ती व्यक्ती मला आवडत नाही.
34.Favorite place to eat?
घरी.

धन्यवाद मीनल, मजा आली!

Advertisements

त्या रात्री पाऊस नव्हता

काही दिवसा पूर्वी, अश्याच एका संध्याकाळी, मी त्याला माझ्या कविता वाचून ऐकवत होतो. माझ्या इंग्रजी ब्लॉग वरील एका पोस्ट बद्दल आम्ही वाद घालत होतो. त्या पोस्ट हून मराठी ब्लॉग च्या कविता वर आम्ही कसे आलो, हे आठवत नाही पण, आलो होतो. दोन-चार कविता वाचून झाल्या, मग तो मला म्हणाला, “तू एक काम कर, इंग्रजीतच लिही, मराठीत लिहायच्या भानगडीत पडू नकोस.” त्या वेळी मला वाईट वाटलं, पण मी गप्प राहिलो.

पे रु चा पा पै

असं वाटतं पूर्वी कधी ऐकलेली एक गोष्ट, समोर एका कागदावर असावी, आणी पटकन ती उचलून वाचता यावी. जेव्हा कोण काही सांगत असतं, तेव्हा आपण कधी लक्ष देत नाही. मनाच्या मागच्या काळ्या खोलीत बंद करून ठेवून टाकतो. वीस-एक वर्षा नंतर, असच एका कुठल्या बुधवार-दुपारच्या चार वाजता, अचानक आठवण येते – आपण जे ऐकलं होतं ते महत्त्वाचं काहीतरी होतं, पण ती नेमकी गोष्ट आठवत नाही.

माझा असा एक कोपरा

Red Chair on Steps

माझा असा एक कोपरा
तुझ्या पासून लांब.
जिथे तुझं वर्चस्व नाही
माझा खोटा कमीपणा नाही.

माझा असा एक कोपरा
तुझ्या पासून लांब.
मी मी असू शकतो
तुला पुरावा द्यावा लागत नाही.

माझा असा एक कोपरा
तुझ्या पासून लांब.
माझा असा एक कोपरा
मी आज शोधत आहे.

काही गोष्ठी

काही गोष्ठी सगळ्यांना सांगता येत नाहीत. शब्द कमी पडतात म्हणुन नाही, त्यांना कितपत कळेल म्हणुन. तुम्च्या कडे शब्दांचा भंडार असेल, पण त्यांची समजण्याची क्षमता?

ती कशी मोजाल?

चारोळ्या

बरेच दिवस झाले, येथे काही लिहीले नाही. कारण साधं-सोपं अाहे, पण थोडं विचित्र. मॅक घेतल्या पासुन मराठीत लिहीणं अवघड झाले अाहे. एका ब्रौझर मध्ये अक्षरं व्यवस्थीत दिसत नाहीत, तर दुसऱ्यात व्यवस्थीत लिहीता येत नाहीत. वर आणि स्पेलचेक नाही. बोंबला!

ह्या चार ओळी लिहायला अर्धा तास लागला.

वर्डप्रेस आता मराठीत?

पण त्या साठी तुमची मदत हवी आहे.

इतके दिवस वर्डप्रेस वर मराठी ब्लॉग हिंदी किंवा इंग्रजी भाषे खाली बनवावे लागत होते. आता मराठीही वेगळी श्रेणी सुरू केली आहे.

हा ब्लॉग, काही दिवसा पूर्वी ब्लॉग ऑफ द मिनिटवर प्रकाशित झाला होता. पण हिंदी ब्लॉग सह. म्हणून मी वर्डप्रेस ला मराठी भाषा समाविष्ट करण्याची विनंती केली.

मराठी भाषा आता वर्डप्रेस मध्ये आहे, आपले ब्लॉग हिंदी किंवा इंग्रजी भाषे खाली बनवावे लागणार नाही. ह्या साठी, आपली मदत हवी आहे. आपण जर वर्डप्रेस मध्ये मराठी ब्लॉग लिहीत असाल, तर http://translate.wordpress.com/ ला जाऊन काही शब्द व शब्दसमुहांचा अनुवाद करण्यात मदत करा.

धन्यवाद!