त्या रात्री पाऊस नव्हता

काही दिवसा पूर्वी, अश्याच एका संध्याकाळी, मी त्याला माझ्या कविता वाचून ऐकवत होतो. माझ्या इंग्रजी ब्लॉग वरील एका पोस्ट बद्दल आम्ही वाद घालत होतो. त्या पोस्ट हून मराठी ब्लॉग च्या कविता वर आम्ही कसे आलो, हे आठवत नाही पण, आलो होतो. दोन-चार कविता वाचून झाल्या, मग तो मला म्हणाला, “तू एक काम कर, इंग्रजीतच लिही, मराठीत लिहायच्या भानगडीत पडू नकोस.” त्या वेळी मला वाईट वाटलं, पण मी गप्प राहिलो.

Advertisements

माझा असा एक कोपरा

Red Chair on Steps

माझा असा एक कोपरा
तुझ्या पासून लांब.
जिथे तुझं वर्चस्व नाही
माझा खोटा कमीपणा नाही.

माझा असा एक कोपरा
तुझ्या पासून लांब.
मी मी असू शकतो
तुला पुरावा द्यावा लागत नाही.

माझा असा एक कोपरा
तुझ्या पासून लांब.
माझा असा एक कोपरा
मी आज शोधत आहे.