आठवणी सुंदर असतात

आम्ही दोघे एकमेकाला फोन करत नाही. पत्र देखील पाठवत नाही, काही वर्षापूर्वी एक इमेल पाठवलं होतं. मला त्याची आठवण येते – त्याला हि माझी आठवण येते. असं नाही कि आम्ही एकमेकाला विसरून गेलो आहे. खरं तर खूप आठवण येते. पण फोन करून काय होणार? काय म्हणणार? मला तुझी आठवण आली म्हणून फोन केला? मग काय? आठवणीचं कारण सांगितल्या नंतर पुढे काय बोलणार? तू कसा – मी कसा – आई-वडील कसे? बाकी?

 

फोन करणे म्हणजे आठवणी ला जीव देणे. जेव्हा एका आठवणी साठी आपण फोन करतो – तेव्हा ती आठवण नाहीशी होऊन जाते. राहते – ती फक्त त्या फोनवर केलेल्या चर्चेची राख.

आठवणींना सीमा नसते. त्यांना खूप मोठा वाव असतो. आठवणीत काहीही होऊ शकतं – फोन वरच्या बोलण्याला सीमा असते.

आठवणी सुंदर असतात.

PS: in the sentence, “फोन करणे म्हणजे आठवणी ला जीव देणे” I really mean to say that calling up, makes the thought material, physical. It becomes discrete. Pardon my impoverished vocabulary. I’d welcome any suggestions.

Advertisements

6 thoughts on “आठवणी सुंदर असतात

  1. असंच असतं आठवणींचं सगळ्या गर्दी करतात एकदम… आणि मग माणूस रमून जातो त्यातच… कधी कधी असं वाटतं नको त्या माणसांची गर्दी… आठवणीच असतात छान.. निदान त्या स्वार्थी तरी नसतात..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s