टॅगलो गेलो

मिंट्स ने हा अवघड टॅग “लावला”. तिचा पोस्ट वाचत गेलो, आणी शेवटी जेंव्हा माझं नाव बघितलं तेंव्हा – थोडा घाबरलो. आधीचे सर्व टॅग बघितले – सर्व मराठी पुस्तकां बद्दल होते. खरं सांगायचं तर एक ही “ख्यात” मराठी पुस्तक वा कादंबरी वाचली नाही. इतरांचे टॅग वाचल्या नंतर, असा विचार केला, टॅग पुस्तका बद्दल आहे – मराठी पुस्तका बद्दल नाही. आणी, इंग्रजीत म्हणतात तसं – ‘हीअर आय गो’. (मिंट्स, तुझं उत्तर वाचलं, हा पोस्ट तीन दिवस अधी सुरू केला होता.)

१)नुकतंच वाचलेले / वा विकत घेतलेले पुस्तक: जॉन ग्रे लिखित हेरेसीझ; प्रगती माया आहे का? आपल्या अवती-भवति सर्व काही जे चालू आहे – ही प्रगती आहे का? पूर्ण वाचून व्हायचं आहे.

२) वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती: जारेद डायमंड लिखित ‘कोलॅप्स’. नुकतंच विकत घेतलं – अजून पूर्ण वाचून झालं नाही. जगण्या वा मरण्याचा पर्याय हा समाजाला सुद्धा असतो – कोणताही समाज – ही निवड कशी करतो? त्याचा आधार काय; त्याचे कारण काय? १२ – १४ असे समाज, त्यांचा इतिहास, त्यांचा अभ्यास, ह्या पुस्तकात केला आहे.

३) अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके: अवघड प्रश्न आहे. फक्त पाच?

(अ) ऍटलस श्रग्ड्ड्, आयन रॅण्ड
(आ) हेरेसीझ; जॉन ग्रे
(इ) द ब्रिज अक्रोस फ़ॉरेवर; रिचर्ड बाख
(ई) लीला; रॉबर्ट प्रिसिग
(उ) द हिस्टरी ऑफ मराठास; जेम्स ग्रांट डफ

(अ ब क ड पेक्षा अ आ इ ई चांगलं वाटतं)

कार्लोस कास्तनेडा, हर्मन हेस्स, आयन रॅण्ड ची इतर पुस्तके, रानडे यांच ‘राइझ ऑफ द मराठा पावर’, व इतर किती तरी ऐतिहासिक पुस्तके.

४) अजून वाचायची आहेत अशी पाच पुस्तके:

(अ) संभाजी (कधीतरी अख्खं मराठी पुस्तक वाचणार, नक्की)
(आ) द नरेटिव्ह ऑफ आर्थर गॉर्डन पिम ऑफ नान्टुकेट; एड्गर ऍलन पो
(इ) सेक्रेड आर्किटेक्चर
(ई) द लास्ट ऑफ द मोहिकन्स; जेम्स फ़ेनिमोर कूपर
(उ) द अनबेरेबल लाइट्नेस ऑफ बीइंग, मिलन कुंडेरा

५) एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे: हे सगळ्यात अवघड आहे! खूपशी पुस्तके आवडीचे आहेत. मिंट्स, सॉरी, ह्या बद्दल नंतर केंव्हा तरी – आता काही सुचत नाही.

Advertisements

3 thoughts on “टॅगलो गेलो

  1. अतुल,
    मी वाचलेले पण इथे लिहिले नाही. पुस्तके मस्त आहेत. छान लिहिलेय. मराठी पुस्तक वाचलेस कि नक्की लिही.

  2. पिंगबॅक टॅगलो गेलो – द्वितीय « माय सह्याद्री

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s