पे रु चा पा पै

असं वाटतं पूर्वी कधी ऐकलेली एक गोष्ट, समोर एका कागदावर असावी, आणी पटकन ती उचलून वाचता यावी. जेव्हा कोण काही सांगत असतं, तेव्हा आपण कधी लक्ष देत नाही. मनाच्या मागच्या काळ्या खोलीत बंद करून ठेवून टाकतो. वीस-एक वर्षा नंतर, असच एका कुठल्या बुधवार-दुपारच्या चार वाजता, अचानक आठवण येते – आपण जे ऐकलं होतं ते महत्त्वाचं काहीतरी होतं, पण ती नेमकी गोष्ट आठवत नाही.

माझा असा एक कोपरा

Red Chair on Steps

माझा असा एक कोपरा
तुझ्या पासून लांब.
जिथे तुझं वर्चस्व नाही
माझा खोटा कमीपणा नाही.

माझा असा एक कोपरा
तुझ्या पासून लांब.
मी मी असू शकतो
तुला पुरावा द्यावा लागत नाही.

माझा असा एक कोपरा
तुझ्या पासून लांब.
माझा असा एक कोपरा
मी आज शोधत आहे.

काही गोष्ठी

काही गोष्ठी सगळ्यांना सांगता येत नाहीत. शब्द कमी पडतात म्हणुन नाही, त्यांना कितपत कळेल म्हणुन. तुम्च्या कडे शब्दांचा भंडार असेल, पण त्यांची समजण्याची क्षमता?

ती कशी मोजाल?

चारोळ्या

बरेच दिवस झाले, येथे काही लिहीले नाही. कारण साधं-सोपं अाहे, पण थोडं विचित्र. मॅक घेतल्या पासुन मराठीत लिहीणं अवघड झाले अाहे. एका ब्रौझर मध्ये अक्षरं व्यवस्थीत दिसत नाहीत, तर दुसऱ्यात व्यवस्थीत लिहीता येत नाहीत. वर आणि स्पेलचेक नाही. बोंबला!

ह्या चार ओळी लिहायला अर्धा तास लागला.

वर्डप्रेस आता मराठीत?

पण त्या साठी तुमची मदत हवी आहे.

इतके दिवस वर्डप्रेस वर मराठी ब्लॉग हिंदी किंवा इंग्रजी भाषे खाली बनवावे लागत होते. आता मराठीही वेगळी श्रेणी सुरू केली आहे.

हा ब्लॉग, काही दिवसा पूर्वी ब्लॉग ऑफ द मिनिटवर प्रकाशित झाला होता. पण हिंदी ब्लॉग सह. म्हणून मी वर्डप्रेस ला मराठी भाषा समाविष्ट करण्याची विनंती केली.

मराठी भाषा आता वर्डप्रेस मध्ये आहे, आपले ब्लॉग हिंदी किंवा इंग्रजी भाषे खाली बनवावे लागणार नाही. ह्या साठी, आपली मदत हवी आहे. आपण जर वर्डप्रेस मध्ये मराठी ब्लॉग लिहीत असाल, तर http://translate.wordpress.com/ ला जाऊन काही शब्द व शब्दसमुहांचा अनुवाद करण्यात मदत करा.

धन्यवाद!

तू अशी जवळी रहा

With you...

काही दिवसा पासून हे चित्र, न बघता, सतत दिसत आहे. एकटेपणा नेहमीच वाईट नसतो – कधीतरी स्वतःच्या विचारांना सुद्धा बोलू द्यावं. कधीतरी त्यांचं सुद्धा ऐकावं. पण कधी-कधी – त्यांचा कलकलाट सहन होत नाही.

ट्रेंट कंट्री पार्क, लंडन. २७ एप्रिल, २००६

द ओव्हरकोट

ह्या पुस्तकाचा प्रभाव बघा, द नेमसेक मध्ये निकोलाइ गॉगल च्या द ओव्हरकोट, ह्या गोष्टी चा बर्‍याचदा उल्लेख आहे. वास्तविक पाहता द नेमसेक काही रित्या द ओव्हरकोट भोवती आखलेली आहे.

एवढे काय आहे ह्या (द ओव्हरकोट) गोष्टी मध्ये? आणि कोण हा निकोलाइ गॉगल? मला राहवेना आणि आज हि गोष्ट वाचून काढली.

काही गोष्टींचा चित्रपट बनवायची गरज नसते. जे काही चित्र लेखकाच्या डोळ्या समोर असतं, त्या साठी त्याचे शब्दच पुरे असतात – पण सर्व लेखक असे लिहू शकत नाहीत. चेहर्‍यावरचे भाव – त्यांचं विवरण करणं खूप काही अवघड नाही – पण मनातले भाव दोन-चार शब्दात सांगणं – ही एक वेगळी कला आहे.

निकोलाइ गॉगल, आता, माझा आणि एक आवडता लेखक.