वर्डप्रेस आता मराठीत?

2007 मे 3
by Gaizabonts

पण त्या साठी तुमची मदत हवी आहे.

इतके दिवस वर्डप्रेस वर मराठी ब्लॉग हिंदी किंवा इंग्रजी भाषे खाली बनवावे लागत होते. आता मराठीही वेगळी श्रेणी सुरू केली आहे.

हा ब्लॉग, काही दिवसा पूर्वी ब्लॉग ऑफ द मिनिटवर प्रकाशित झाला होता. पण हिंदी ब्लॉग सह. म्हणून मी वर्डप्रेस ला मराठी भाषा समाविष्ट करण्याची विनंती केली.

मराठी भाषा आता वर्डप्रेस मध्ये आहे, आपले ब्लॉग हिंदी किंवा इंग्रजी भाषे खाली बनवावे लागणार नाही. ह्या साठी, आपली मदत हवी आहे. आपण जर वर्डप्रेस मध्ये मराठी ब्लॉग लिहीत असाल, तर http://translate.wordpress.com/ ला जाऊन काही शब्द व शब्दसमुहांचा अनुवाद करण्यात मदत करा.

धन्यवाद!

4 प्रतिसाद leave one →
  1. 2007 जून 4

    अतुल,

    वर्डप्रेस मराठीत आणण्यासाठी आपण पुढाकार घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
    माझ्या अनुदिनीवर प्रतिक्रिया ठेवल्याबद्दल धन्यवाद. मीसुद्धा या उपक्रमात खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहे, :)

    क.लो.अ.,
    शैलेश

  2. 2007 जून 5

    आपण घेतलेल्या श्रमांमुळे आपल्या मायमराठीला स्वतःचे असे स्थान मिळाले , त्याबदाल आपली आभारी आहे.

  3. 2007 जून 5

    == शैलेश व माझी दुनिया:
    आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद!
    :)

  4. 2007 जून 20

    वेबदुनिया आता मराठीत
    आपल्यापुढे वेबदु‍निया मराठी हे संकेतस्थळ सादर करताना खूप आनंद होत आहे. मराठी वाचक फार चोखंदळ समजला जातो. त्याच्या वेगवेगळ्या गरजा समजून घेऊन आम्ही वेबदुनिया मराठी हे संकेतस्थळ आपल्यापुढे ठेवत आहोत.
    वेबदुनिया मराठी या संकेतस्थळाचा हा पहिलाच टप्पा आहे. तंत्रज्ञान बदलत जाईल, काळ बदलत जाईल तसे आपल्या संकेतस्थळातही बदल होत जातील. या संकेतस्थळावर आपल्याला महाराष्ट्रासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बातम्या, अर्थविषयक घडामोडी, ‍क्रीडा, साहित्य, पर्यटन, मनोरंजन, मराठी चित्रपट, बॉलीवूडच्या घडामोडी, आरोग्य, सौंदर्य, ज्योतिष आदी सर्व प्रकारची माहिती मिळेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Note: You can use basic XHTML in your comments. Your email address will never be published.

Subscribe to this comment feed via RSS