उत्तर
November 2, 2006 by Gaizabonts
काही गोष्टी लिहिता येत नाहीत. काही भावना व्यक्त करता येत नाहीत. आतल्या आत एकमेकाशी भांडत बसतात. पन्नास वेळा काही लिहायला सुरुवात होती, पन्नास वेळा कागद फाडला जातो; चुरगाळला जातो. शब्दांना दोष दिला जातो, शब्द अपुरे पडतात म्हणे. हे लिहिताना थोडं हसू येतं, शब्द अपुरे तेव्हा पडतात जेव्हा स्वतःलाच भावना ओळखू येत नाही.
तुला काय वाटतं?
ह्या प्रश्नाला सोपे असे उत्तर असते, तर किती बरं झालं असतं - दोन-चार मोजक्या भावना असत्या तर किती बरं झालं असतं! मला जे वाटते ते शब्दांच्या पालीकडले नसून माझ्या समजण्या ही पालीकडले असेल तर तुला काय उत्तर देऊ?