एक अर्धवट टॅग
सप्टेंबर 26, 2006

मिंट्स ने पूर्वी मला टॅग “लावला” होता. त्या टॅगच्या पाचव्या प्रश्नाचं उत्तर मी दिले नव्हते. प्रश्न होता, एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे.
विश्वास पाटील लिखित संभाजी.
सध्या तरी सर्वात प्रिय पुस्तक. अजून वाचायला घेतले नाही कारण एक पान वाचायला मला साधारण अर्धा तास लागतो. हे आठशे चाळीस पानांचं पुस्तक वाचायला साधारण १८ दिवस लागतील – रोज चोवीस तास वाचले तर.
द ऍलकेमिस्ट ह्या पुस्तकाचे भाषांतर बऱ्याच भाषेत झालेले आहे. म्हणून का हे पुस्तक प्रसिद्ध आहे? का ह्या प्रसिद्धींचं श्रेय त्या पुस्तकच्या प्रकाशकाला आणी लेखकाला द्यायचे? उत्तम विक्रीनिती?
कदाचित दोन्ही.
मराठी साहित्य, मराठी भाषेवर अवलंबून नसावे. त्या प्रमाणे, कोणतेही साहित्य कोणत्याही भाषेवर अवलंबून नसावे.
Trackbacks