Posted in घर, मराठी, विचार | 5 Comments »
काही गोष्ठी सगळ्यांना सांगता येत नाहीत. शब्द कमी पडतात म्हणुन नाही, त्यांना कितपत कळेल म्हणुन. तुम्च्या कडे शब्दांचा भंडार असेल, पण त्यांची समजण्याची क्षमता?
ती कशी मोजाल?
Posted in भाषा, मराठी, विचार, शब्द | 4 Comments »
बरेच दिवस झाले, येथे काही लिहीले नाही. कारण साधं-सोपं अाहे, पण थोडं विचित्र. मॅक घेतल्या पासुन मराठीत लिहीणं अवघड झाले अाहे. एका ब्रौझर मध्ये अक्षरं व्यवस्थीत दिसत नाहीत, तर दुसऱ्यात व्यवस्थीत लिहीता येत नाहीत. वर आणि स्पेलचेक नाही. बोंबला!
ह्या चार ओळी लिहायला अर्धा तास लागला.
Posted in मराठी, लेखक, शब्द | 2 Comments »
पण त्या साठी तुमची मदत हवी आहे.
इतके दिवस वर्डप्रेस वर मराठी ब्लॉग हिंदी किंवा इंग्रजी भाषे खाली बनवावे लागत होते. आता ‘मराठी’ ही वेगळी श्रेणी सुरू केली आहे.
हा ब्लॉग, काही दिवसा पूर्वी ‘ब्लॉग ऑफ द मिनिट’ वर प्रकाशित झाला होता. पण हिंदी ब्लॉग सह. म्हणून मी वर्डप्रेस ला मराठी भाषा समाविष्ट करण्याची विनंती केली.
मराठी भाषा आता वर्डप्रेस मध्ये आहे, आपले ब्लॉग हिंदी किंवा इंग्रजी भाषे खाली बनवावे लागणार नाही. ह्या साठी, आपली मदत हवी आहे. आपण जर वर्डप्रेस मध्ये मराठी ब्लॉग लिहीत असाल, तर http://translate.wordpress.com/ ला जाऊन काही शब्द व शब्दसमुहांचा अनुवाद करण्यात मदत करा.
धन्यवाद!
Posted in भाषा, मराठी | 4 Comments »
काही दिवसा पासून हे चित्र, न बघता, सतत दिसत आहे. एकटेपणा नेहमीच वाईट नसतो - कधीतरी स्वतःच्या विचारांना सुद्धा बोलू द्यावं. कधीतरी त्यांचं सुद्धा ऐकावं. पण कधी-कधी - त्यांचा कलकलाट सहन होत नाही.
ट्रेंट कंट्री पार्क, लंडन. २७ एप्रिल, २००६
Posted in मराठी, विचार, शब्द | 2 Comments »
ह्या पुस्तकाचा प्रभाव बघा, द नेमसेक मध्ये निकोलाइ गॉगल च्या द ओव्हरकोट, ह्या गोष्टी चा बर्याचदा उल्लेख आहे. वास्तविक पाहता द नेमसेक काही रित्या द ओव्हरकोट भोवती आखलेली आहे.
एवढे काय आहे ह्या (द ओव्हरकोट) गोष्टी मध्ये? आणि कोण हा निकोलाइ गॉगल? मला राहवेना आणि आज हि गोष्ट वाचून काढली.
काही गोष्टींचा चित्रपट बनवायची गरज नसते. जे काही चित्र लेखकाच्या डोळ्या समोर असतं, त्या साठी त्याचे शब्दच पुरे असतात - पण सर्व लेखक असे लिहू शकत नाहीत. चेहर्यावरचे भाव - त्यांचं विवरण करणं खूप काही अवघड नाही - पण मनातले भाव दोन-चार शब्दात सांगणं - ही एक वेगळी कला आहे.
निकोलाइ गॉगल, आता, माझा आणि एक आवडता लेखक.
Posted in चित्रपट, पुस्तक, भाषा, मराठी, लेखक, शब्द, साहित्य | 2 Comments »
काल, काही तासात झुंपा लाहिरी चे “नेमसेक” वाचून काढले. खूप कमी अशी पुस्तके आहेत, जे एकदा का हातात घेतले की वेळेचं आणि भुकेचं भान राहत नाही. “नेमसेक”, त्या गटातलं एक पुस्तक. ह्या पुस्तकावर आधारीत त्याच नावाचा एक चित्रपट ही आहे, तो मी अजून बघितला नाही (आणि आता विशेष इच्छा पण नाही राहिली). पुस्तक वाचताना जे चित्र मनात उभे झाले, ते कदाचित पुसलं जाईल.
नावात ओळखी चा शोध - असा ह्या पुस्तकाचा ग्रंथ-परिचय.
जेव्हा अस्मिता चा प्रश्न येतो, तेव्हा, नेहमी अश्या गोष्टींचे मुख्य पात्र भारतीय अप्रवासी का असतात? भारतात राहणाऱ्यांना असा प्रश्न कधी येत नाही का?
Posted in पुस्तक, मराठी, विचार, साहित्य | 9 Comments »
शेवटच्या अंका नंतर टाळ्या वाजल्या नाही तर
ते भरलेले लाल डोळे पुसत
मनोगतीने मनोगत म्हणावं म्हणून
रंगमंचावर परत येशील का?
शब्द तू जोडलेले कुणी वाचले नाही तर
शब्दांचा तिरस्कार न करत
विचार फक्त व्यक्त करायचे म्हणून
स्वतःसाठी परत लिहिशील का?
दारा बाहेर असल्याचा भास झाला तर
थरथरणारे हात घट करत
मनातली भिती घालवून
माझ्यासाठी दार उघडशील का?
काही गोष्टी लिहिता येत नाहीत. काही भावना व्यक्त करता येत नाहीत. आतल्या आत एकमेकाशी भांडत बसतात. पन्नास वेळा काही लिहायला सुरुवात होती, पन्नास वेळा कागद फाडला जातो; चुरगाळला जातो. शब्दांना दोष दिला जातो, शब्द अपुरे पडतात म्हणे. हे लिहिताना थोडं हसू येतं, शब्द अपुरे तेव्हा पडतात जेव्हा स्वतःलाच भावना ओळखू येत नाही.
तुला काय वाटतं?
ह्या प्रश्नाला सोपे असे उत्तर असते, तर किती बरं झालं असतं - दोन-चार मोजक्या भावना असत्या तर किती बरं झालं असतं! मला जे वाटते ते शब्दांच्या पालीकडले नसून माझ्या समजण्या ही पालीकडले असेल तर तुला काय उत्तर देऊ?
Posted in विचार, शब्द | No Comments »



